‘सरहद’पार मदत, आसाम हिंसाचारग्रस्त 50 मुलींना घेतले दत्तक

August 13, 2012 9:50 AM0 commentsViews: 5

13 ऑगस्ट

आसाममधल्या हिंसाचाराचा मुंबईत निषेध करण्यता आला आणि त्याला हिंसेचं गालबोट लागलं. तर दुसरीकडे याच आसाममधल्या हिंसाचारग्रस्त 50 मुलींना दत्तक घेऊन सरहद संस्थेनं एक सकारात्मक उदारहण ठेवलं आहे. हाक ब्रम्हपुत्रेची या मोहिमेअंतर्गत या मुलींना दत्तक घेतलं जाणार आहे. या मुलींची राहण्याची व्यवस्था,त्याचे शिक्षण या सगळ्याची जबाबदारी संस्थेतर्फे घेतली जाणार आहे. सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी ही माहिती दिली. आसाममधल्या कोक्राझार, चिराग अशा भागांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारात 70 हुन अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर चार लाखांपेक्षाही अधिक लोक स्थलांतरीतांसाठीच्या छावण्यांमध्ये रहात आहेत.

close