दहीहंडीच्या उत्सवात 3 गोविंदांचा मृत्यू ,251 जखमी

August 11, 2012 10:18 AM0 commentsViews: 9

11 ऑगस्ट

काल शुक्रवारच्या दहीहंडी उत्सवात काही दुखद घटनाही घडल्या.. दहीहंडी दरम्यान वेगवेगळ्या घटनेत 3 गोविंदाना आपला जीव गमावावा लागलाय. तर 251 गोंविदा जखमी झाले आहे. रायगड जिल्हात दोन तर ठाण्यात एका गोंविदाचा मृत्यू झाला. कुर्ल्यातील हनुमान क्रीडा मंडळचा गोंविदा दीपक तुपे हा फुटपाथवर वाहतूक पोलिसांना बेशुध्दावस्थेत सापडला. त्याच पथक पाचपाखाडी इथ संघर्ष दहीहंडीत थर लावत होतं. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र दाखल केल्यावर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोस्टमार्टेम अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल. दिपक हा त्याच्या कुंटुबातील एकमेव कमावता व्यक्ती होता.

close