राज्य सरकार बरखास्त करण्याची युतीची मागणी

August 13, 2012 10:16 AM0 commentsViews: 2

13 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली. शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या प्रकरणी निवदेन देण्याची मागणी केली. सेना भाजपचे खासदार आक्रमक होताच काँग्रेसच्या राज्यातील खासदारांनीही उत्तर देण्याचा प्रयत्न केल्यानं गदारोळ झाला. त्यानंतर जेवणापूर्वीच लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

close