मीरा भाईंदर पालिकेत सत्तेच्या चाव्या अपक्ष,मनसेकडे

August 13, 2012 11:11 AM0 commentsViews: 7

13 ऑगस्ट

मीरा -भाईंदर महापालिकेच्या संपूर्ण 92 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. काँग्रेसचे आमदार मुजफ्फर हुसेन यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सुरुवातीपासून युतीने आघाडी घेतली होती मात्र अखेरीस डाव पलटला आहे. आता आघाडी आणि युतीला सत्तेत येण्याकरता केवळ दोन जागेची गरज आहे. आणि आता पुन्हा एकदा याठिकाणी सत्तेच्या चाव्या अपक्ष आणि मनसेच्या हाती गेल्या आहेत. सकाळी निकाल यायला सुरुवात झाली, तेव्हा निकालाचं चित्र साधारण संमिश्र दिसत होतं. पण निकालामध्ये युतीनं आघाडी घेतली. आणि शेवटच्या टप्प्यात उरलेल्या अठरा जागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरशी केली आणि निकालात साधारण बरोबरी साधली. त्यामुळे एकेएक जागा जिंकलेल्या मनसे आणि अपक्षांकडे आता सत्तेच्या चाव्या आल्या आहेत.

मीरा भाईंदरचा निकाल

एकूण जागा – 95बहुमतासाठी – 48

भाजप – 29शिवसेना- 14युती – 43राष्ट्रवादी काँग्रेस – 27काँग्रेस – 19काँग्रेस + राष्ट्रवादी 46बहुजन विकास आघाडी – 3मनसे-1अपक्ष-1न्यायप्रविष्ट – 1

close