सीएसटी हिंसाचारात अंडरवर्ल्डचा हात ?

August 13, 2012 11:31 AM0 commentsViews: 7

13 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी सीएसटी परिसरात झालेल्या हिंसाचारात अंडरवर्ल्डचा हात असल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे. अशी खात्रीलायक माहिती केंद्रीय गृहमंत्रालयातल्या सूत्रांनी दिली आहे. रझा अकादमीने आयोजित केलेल्या मोर्चामध्ये 'त्या' जमावातला एक गट हिंसा करण्यासाठीच आला होता. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता असाही पोलिसांना संशय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये जमावाकडे लोखंडी रॉड, पेट्रोल कॅन आणि चाकू असल्याचं दिसलंय. त्यामुळे या संशयाला आणखी बळ मिळालंय. आझाद मैदनातीलं सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजमुळे घटनाक्रम समजण्यात मदत होतं आहे.याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.

close