नरिमन हाऊसवर कमांडोंची शेवटची चढाई सुरू

November 28, 2008 3:35 AM0 commentsViews: 4

28 नोव्हेंबर, मुंबई2.30 PMनरिमन हाउसमधला संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहचला आहे. जवळपास सर्व ओलिसांची सुटका करण्यात कमांडोजनी यश मिळवलं आहे. या कारवाईसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. हेलिकॉप्टरमधून कमांडो बिल्डींगच्या छतावर उतरले आहेत. मात्र त्यांना अतिरेक्यांच्या तुफान गोळीबाराला सामोरं जावं लागतंय. दरम्यान नरिमन हाउसमधून एक पांढरा रुमाल दाखवण्यात आला आहे. मात्र तो कोणी दाखवला, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.नरिमन हाऊसमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांनी रात्री तीन वाजता दोन ग्रेनेड हल्ले केले, तर पहाटे आणखी एक ग्रेनेड हल्ला केला. इथं कमांडो आणि अतिरेक्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. तत्पूर्वी नरिमन हाऊसमध्ये एनएसजी कंमाडोनी आणखी 8 ओलिसांना सोडवण्यात यश मिळवलय. यामुळं एनएसजीनं आतापर्यंत सोडवलेल्या नागरिकांची संख्या दहा झाली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव आजूबाजूच्या काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत.