पुण्यात मणिपुरी तरुणांना मारहाण

August 13, 2012 12:18 PM0 commentsViews: 2

13 ऑगस्ट

पुण्यात वास्तव्य करणार्‍या ईशान्य भारतातील रहिवाशांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. जवळपास 10 जणांना मारहाण झाली आहे. याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. मुख्यत: ज्यांना मारहाण झालीय ते विद्यार्थी आहेत. सुमारे 4 विद्यार्थ्यांना पूना कॉलेजजवळ अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची तक्रार क ँटोन्मेंट पोलीस ठाण्यात करण्यात आली. प्रेमानंद खोमद्राम या मणिपुरी विद्यार्थ्याला पूना कॉलेजजवळ आणि कहोमदाई पनमेई याला कोंढवा भागात मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी मणिपुरी रहीवाशी संघटनेनं वरीष्ठ पोलीसांसाची भेटही घेतलीय. भारताचे नागरिक असूनही आम्हाला इथं राहण्यास का विरोध केला जातोय असा प्रश्न या विद्यार्थ्यांनी विचारलाय.

close