पल्लवी पुरकायस्थ हत्येप्रकरणी वॉचमनला 6 दिवसांची पोलीस कोठडी

August 11, 2012 10:16 AM0 commentsViews: 14

11 ऑगस्ट

मुंबईतील वडाळ्यात झालेल्या पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणी आरोपी सज्जाद अहमद पठाणला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आता सज्जाद काम करत असलेल्या सुरक्षा एजन्सीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. तो काम करत असलेल्या सुरक्षा एजन्सीच्या परवान्याची तपासणी सुरु आहे. पल्लवी राहत असलेल्या बिल्डिंगचा वॉचमन पठाण याने आपण पल्लवीचा खून केल्याची कबुली दिली. पल्लवीने आपल्या घरातील वीज वारंवार जात असल्यामुळे रात्री वॉचमन पठाणला फोन केला होता. याच कारणावरुन पल्लवी आणि वॉचमन पठाणमध्ये बाचाबाची झाली आणि रागाच्या भरात वॉचमनने पल्लवीचा खून केला. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने पठाणला काल शुक्रवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरुन ताब्यात घेतले.

close