कुस्तीपटू योगेश्वर दत्त पराभूत

August 11, 2012 3:28 PM0 commentsViews: 4

11 ऑगस्ट

लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या आणखी एका कुस्तीपटूला पराभवाचा धक्का बसला आहे. 60 किलो वजनी गटात भारताच्या योगेश्वर दत्तला दुसर्‍या फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या फेरीत बल्गेरियाच्या इरोनोओविच गुडीचा पराभव करत योगेश्वर दत्तनं विजयी सलामी दिली. पण दुसर्‍या फेरीत त्याला कामगिरीत सातत्य राखता आलं नाही. रशियाच्या बेसिक कुडुकोव्हनं त्याचा 3-0 असा सहज पराभव केला.

close