सिंचन प्रकल्पांचा निधी गेला कुठे ?, याचिका दाखल

August 13, 2012 2:26 PM0 commentsViews: 4

13 ऑगस्ट

विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दिवसेंदिवस वाढत असला तरी ज्या पध्दतीने सिंचन प्रकल्पावर जो कोट्यावधी चा निधी खर्च करण्यात आला तो गेला कुठे ? हा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. विदर्भातील 38 सिंचन प्रकल्पासाठी निर्धारित 6 हजार 6 कोटीच्या खर्चाला केवळ 9 महिन्याच्या काळात वाढ करून 20 हजार कोटींवर वाढीव दर करत 26 हजार कोटी करण्यात आला यात गोसीखुर्द प्रकल्पाचा ही समावेश आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकल्पात काम करणार्‍या कंत्राटदारांना पैशाचे वाटप करण्यात आले. या याचिकेची गंभीर दखल कोर्टाने घेतली आहे. यात विदर्भ सिंचन विभागाला कोर्टाने नोटीस बजावली आहे.

close