ताजमधील कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद

November 28, 2008 4:39 PM0 commentsViews: 9

28 नोव्हेंबर, मुंबईताजमधील कारवाईत पहिल्यांदाच लष्करी अधिकारी कामी आला आहे. या कारवाईते मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले आहेत. मेजर संदीप उन्नीकृष्णन बेंगळुरूचे होते. एनएसजीच्या डायरेक्टर जनरलनी ही माहिती दिली आहे. बुधवार रात्रीपासून हॉटेल ताज, ओबेरॉय आणि नरिमन भवनमध्ये अतिरेक्यांनी नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी लष्कराचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं. सतरा मार्च 1977 रोजी संदीप उन्नीकृष्णन यांचा जन्म झाला होता. केरळहून सुमारे चाळीस वर्षांपूर्वी संदीप यांच्या परिवारानं बंगळुरूमध्ये कायमचं स्थलांतर केलं होतं. इस्रो क़ॉलनीतल्या अक्षय विहार लेआऊटमध्ये त्यांचं घर आहे,जिथं आता शोककळा पसरलीय. आता संदीप यांच्यामागं त्यांचे आई-वडिल आणि मोठी बहीण संध्या या आहेत . संदीप यांचं शालेय शिक्षण उल्सूरजवळच्या फ्रँक अँटनी पब्लिक स्कूलमध्ये झालं होतं. बारावीनंतर 1999 साली त्यांना एनडीएमधून कमिशन मिळालं होतं आणि तिथूनच मेजर संदीप यांच्या लष्करी जीवनाची सुरूवात झाली . संदीप एक उत्तम अ‍ॅथलेटही होते. सातव्या बिहार रेजिमेंटमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्यानंतर गेल्याच वर्षी म्हणजे वीस जानेवारी 2007साली त्यांचा एनएसजीमध्ये समावेश करण्यात आला होता.

close