कोट्यावधींच्या धान्याला फुटले कोंब

August 13, 2012 2:34 PM0 commentsViews: 11

13 ऑगस्ट

राज्यात एकीकडे दुष्काळाने लोक हैराण झाले आहेत. महागाईमुळे सामान्यांचं जगणं कठीण झालंय पण सरकारने विकत घेतलेलं लाखो टन धान्य उघड्यावर पावसामुळे सडत असल्याचं समोर आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेलं 15 लाख टन धान सडतंय. तर काही ठिकाणी गुरंच हे धान संपवत असल्याचंही दिसतंय. पण याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे उत्तर आदिवासी विकासमंत्री बबनराव पाचपुते यांनी दिलंय.

तसेच राज्य सरकारकडे धान साठवण्यासाठी गोदामच नसल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली विभाग आणि अहेरी विभागाने धान उत्पादक शेतकर्‍यांकडून 2010 – 12 मध्ये 1 लाख 74 हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. शेतकर्‍यांना योग्य भाव मिळावा आणि खाजगी व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून ही खरेदी करण्यात आली. शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आलेले धान सरकारकडून वेळेत उचलण्यात आले नाही. त्यामुळे 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे हे धान गोडावून मध्ये सडत पडलेल आहे.

close