जेष्ठ काँग्रेस नेते प्रभाकर कुंटे यांचं निधन

August 15, 2012 1:58 PM0 commentsViews: 5

15 ऑगस्ट

जेष्ठ स्वातंत्रसैनिक आणि काँग्रेस नेते प्रभाकर कुंटे यांचं आज निधन झालं. गेल्या अनेक महिन्यांपासून ते अस्वस्थ होते. कुंटे यांनी 1942 च्या 'चले जाव'च्या लढ्यात भाग घेतला आणि तुंरुगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती संग्रामातही ते सक्रीय होते. 1972 मध्ये शंकराराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात ते गृहनिर्माण राज्यमंत्री होते. त्यांनी रायगड मिलिट्री स्कूलची स्थापनाही केली.

close