मुंबई हिंसाचाराचे संसदेत पडसाद

August 14, 2012 9:35 AM0 commentsViews: 4

14 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद सलग दुसर्‍या दिवशी संसदेत उमटले. हिंसाचाराच्या मुद्यावरुन आज लोकसभेत, गदारोळ झाला. शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी मुंबई हिंसाचाराच्या घटनेवरुन सरकारवर जोरदार टीका केली. तर राज्यसभेतही हा मुद्दा गाजला. रझा अकादमी या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. तर हा मोर्चा आयोजित करण्यामागे काँग्रेसच्या मंत्र्यांचा हात असल्याचा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला.

close