देवकरांना झेंडावंदन करायला महिलांनी केला मज्जाव

August 15, 2012 2:09 PM0 commentsViews: 24

15 ऑगस्ट

जळगावला पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते होणार्‍या झेंडावंदनाला शिवसेना भाजपने तीव्र विरोध केला होता. देवकर हे घरकुल घोटाळा प्रकरणातील आरोपी असून हायकोर्टाने त्यांचा जामीन रद्द केल्याने त्यांची अटक ही निश्चित मानली जातेय. यामुळे देवकर यांच्या हस्ते झेंडावंदन करू नये, अशी मागणीही सेना भाजपने जिल्हाधिकार्‍यांना केली होती. सकाळी शिवसेनेच्या महिला आघाडीने देवकर यांच्या घरी जोरदार घोषणाबाजी केली. घराबाहेर आलेल्या देवकर आणि निदर्शक महिलांची शाब्दिक चकमकही झाली. अखेर या निदर्शकांना पोलिसांनी रोखल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं.

close