बाबा रामदेव यांनी उपोषण सोडलं

August 14, 2012 9:39 AM0 commentsViews: 2

14 ऑगस्ट

योगगुरु बाबा रामदेव यांनी अखेर पाचव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. डॉ. आंबेडकर स्टेडियममध्ये पोलिसांनी काल त्यांची सुटका केली होती, पण बाबांनी आपल्या समर्थकांसह तिथंच ठिय्या आंदोलन करत बाहेर पडण्यास नकार दिला होता. पण आज दिल्ली पोलिसांनी बाबांना आणि त्यांच्या समर्थकांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मैदान सोडण्याची विनंती केली आणि बाबांना उपोषण सोडून ते हरिद्वारला निघून गेले आहे. पण उपोषण सोडण्यापूर्वी बाबांनी पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केलं.

close