शहिदांच्या कुटुंबियांची बिकट अवस्था

August 15, 2012 2:16 PM0 commentsViews: 1

15 ऑगस्ट

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र देश स्वतंत्र झाल्यावर प्रशासनाला या देशभक्त कुटंुबियांचा विसर पडल्याचं चित्र आहे. स्वातंत्र्यलढ्यात वर्ध्यातल्या आष्टीमधल्या 6 वीरांनी पोलिसांच्या गोळीबारात आपला प्राण दिला. मात्र या शहिद कुंटुबियांची अवस्था आज बिकट आहे. शहिद पंची पोलसू गोंड यांची मुलगी पंचफुला उईके याचं घर मोलमजुरीवर चालतं. घरात विजेचा खांब आहे मात्र वीज नाही, चूल आहे मात्र खाण्यास अन्न मिळत नाही अशी अवस्था आहे. या शहिद कुंटुबाच्या सन्मानानं जगत यावं यासाठी प्रशासनानं पुढाकार घेण्याची मागणी आष्टीच्या ग्रामस्थांनी केली आहे.

close