मुंबई हिंसाचारासंबंधी मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

August 14, 2012 9:52 AM0 commentsViews: 2

14 ऑगस्ट

मुंबई शनिवारी झालेल्या हिंसाचारासंबंधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. त्यानंतरते केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही भेट घेणार आहेत. या हिंसाचारामागे कोण आहेत याबाबत केंद्रीय गृप्तचर संस्थांकडे असलेल्या माहितीबाबतही मुख्यमंत्री माहिती घेणार आहेत. दरम्यान, या हिंसाचारात अंडरवर्ल्डचा हात असल्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातल्या सूत्रांनी ही माहिती दिली. जमावातला एक गट हिंसा करण्यासाठीच आला होता, असंही सुत्रांनी सांगितलंय. आझाद मैदनातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय आणि या CCTV फुटेजमुळे घटनाक्रम समजण्यात मदत होतीये. गृहमंत्री आर आर पाटील यांनीही या घटनेत अंडरवर्ल्डचा हात असल्याच्या शक्यतेचा इन्कार केला नाही. आम्ही सर्व बाजूंनी चौकशी करतोय योग्य वेळी बोलू असंही गृहमंत्री म्हणाले.

close