विजय गावित यांच्या गाडीला अपघात

August 15, 2012 2:22 PM0 commentsViews: 1

15 ऑगस्ट

वैद्यकीय शिक्षण मंत्री विजय गावित यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात गावित यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झालीय. त्यांना अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात तातडीने ऍडमिट करण्यात आलंय. गावित यांच्यासोबत 4 जण जखमी झाले आहे. वाशिम इथला शासकीय दौरा आटोपून मोटारीने अकोला इथं येत असताना हा अपघात झाला. मालेगावजवळ त्यांच्या ताफ्यातील एका खाजगी गाडीचं टायर फुटल्याने ही गाडी ताफ्यात घुसली आणि गावित यांच्या गाडीवर जाऊन आदळली.

close