‘भारतीय’सुरु ठेवा अन्यथा ‘सुवर्णकमळ’ परत करणार’

August 14, 2012 10:03 AM0 commentsViews: 4

14 ऑगस्ट

मनसे चित्रपट सेना आणि भारतीय चित्रपट सेना यांच्या दणक्यानं मल्टिप्लेक्समधून भारतीय सिनेमा काढला जाणार नसला तरी सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये 'भारतीय'चं भविष्य काही चांगलं दिसत नाहीय. 'एक था टायगर'ला स्क्रीन देण्यासाठी सिंगल स्क्रीन थिएटरमधून आता भारतीय सिनेमा काढला जाणार आहे. त्याचा निषेध म्हणून देऊळ आणि भारतीय सिनेमाचे निर्माते अभिजीत घोलप यांनी 'देऊळ'ला मिळालेला राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार परत करायचा इशारा दिला आहे. 15 ऑगस्टला म्हणजे उद्या 'एक था टायगर' रिलीज होतोय. त्यामुळे सिंगल स्क्रीन थिएटर्सवाल्यांनी भारतीयकडे पाठ फिरवली आहे.

close