सातारा जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळाच्या तीव्र झळा

August 16, 2012 10:18 AM0 commentsViews: 19

16 ऑगस्ट

अर्धा पावसाळा संपला तरी समाधानकारक पाऊस काही पडत नाही. पावसाअभावी हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सातारा जिल्ह्यातल्या माण, खटाव आणि फलटण तालुक्यातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. माण, खटाव आणि फलटण तालुक्यात शेतकर्‍यांना आपली जनावरे वाचवण्यासाठी चारा छावण्यांचा आधार घ्यावा लागतोय. जनावरांना चारा आणि पाणी मिळावं म्हणून प्रशासनाने 19 चारा छावण्या या भागात उभारल्यात. या छावण्यांमध्ये तब्बल 22 हजार 500 जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही जनावरं शेतकर्‍यांनी या चारा छावण्यांमध्ये आणून तिथेच आपले संसार थाटलेत. जनावरांच्या चारा-पाण्याच्या प्रश्नासोबतच या भागातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला आहे. या तालुक्यातील 358 गावं ही टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहे. सध्या या गावांना 262 टँकर्समधून पाणीपुरवठा केला जातोय.

close