एक दिलखुलास माणूस नजरेआड गेला – शिवसेनाप्रमुख

August 14, 2012 4:00 PM0 commentsViews: 14

14 ऑगस्ट

'अशा गोष्टीवर विश्वास ठेवंण नेहमीचं कठीण असतं. पण विश्वास ठेवावा लागतो. विलासराव गेले, एक दिलखुलास माणूस नजरेआड झाला. तसे त्यांचे वयही जास्त नव्हते, हरनहुन्नरी माणूस, सदा हसरा राजकारणांवर त्यांचा तसा ठसा होता. विलासराव आणि मुंडे यांची जुगलंबदी ऐकण्यासारखी होतं असे यात विशेष करुन विलासरावांचा हजरजबाबीपणा वाखाणण्यासारखा असायचा. विलासराव आणि सुशील कुमार शिंदे हा 'दो हंसो का जोडा' प्रसिध्द होता. त्यातला एक हंस दूर गेला, काय करु शकतो आपण ? फक्त श्रध्दांजल्या आणि आदंराजल्या वाहणे एवढचं आपल्या हाती असते. त्यानूसार मी या दिलखुलास विलासरावांना माझ्यातर्फे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे आणि अंसख्य शिवसैनिकांतर्फे रामराम करीत आहे.' – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

close