विलासरावांचं क्रीडा क्षेत्रातील योगदान

August 14, 2012 4:44 PM0 commentsViews: 5

14 ऑगस्ट

राजकारणाबरोबरच क्रीडा क्षेत्रामध्येही विलासराव देशमुख यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. राजकीय आखाडा गाजवणार्‍या विलासरावांचं राजकीय कौशल्य मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडुणकीत पाहिला मिळालं. 15 जुलै 2011 ला ते एमसीएचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. आणि गेल्या वर्षाभरात त्यांनी मुंबई क्रिकेटसाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्याआधी 2009 ते 2011 या काळा त्यांनी एमसीएचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केलं होतं. खिलाडू व्यक्तिमत्व म्हणून ओळख जाणारे विलासराव देशमुख चांगले क्रीडा जाणकारही होते. क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि टेबल टेनिस या खेळांची आवड त्यांनी जपली. युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी विलासराव स्पोर्ट्स फाऊंडेशनच्यावतीनं खेळाडूंना स्कॉलरशीपही देण्यात येते.

close