पाकमध्ये दहशतवादी हल्ल्यात 7 जण ठार

August 16, 2012 12:14 PM0 commentsViews: 1

16 ऑगस्ट

पाकिस्तानच्या कामरा एअरबेसवर आज पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 7 दहशतवादी ठार झाले. आज पहाटे साडेतीन वाजता दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. नऊ दहशतवादी एअरबेसवर घुसले. त्यापैकी एका दहशतवाद्याच्या शरीरावर स्फोटकं बांधलेली होती अशी माहिती सुत्रांनी दिली. पाकिस्तान सैनिक आणि दहशतवादी यांच्यात जवळपास दोन तास धुमश्चक्री सुरु होती. सुत्रांच्या माहितीनुसार हे दहशतवादी जवानांच्या वेशात आले होते. हा एअरबेस इस्लामाबादपासून जवळ होता.

close