लातूर जिल्ह्यावर शोककळा

August 14, 2012 9:03 AM0 commentsViews: 3

14 ऑगस्ट

विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या बाजारपेठ, शाळा, कॉलेजेस बंद करण्यात आली. आता 2 दिवस इथल्या बाजारपेठा बंद राहणार आहेत. उद्या सकाळी 9 वाजता विलासरावांचं पाथिर्व बाभळगावला आणलं जाईल. त्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत अंत्यदर्शन घेता येतील. आणि दुपारी 4 वाजता बाभळगावमध्येच त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विलासराव हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते तेव्हा अख्या लातूरकरांनी देवाला पाण्यात ठेवलं होतं. त्यांची प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सर्वधर्मिय लोकांनी देवाकडे प्रार्थना केली होती. 'विलासराव म्हणजे लातूर, लातूर म्हणजे विलासराव' अशी ओळखच लातूरची होती. विलासरावांच्या निधनामुळे लातूर पोरके झाले अशी भावना व्यक्त होतं आहे.

close