‘टायगर’ने पहिल्याच दिवशी 35 कोटी कमावले

August 16, 2012 12:43 PM0 commentsViews: 95

16 ऑगस्ट

एक था टायगर हा सिनेमा बुधवारीच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच रिलीज झाला. सर्वाधिक स्क्रीन्समध्ये हा सिनेमा रिलीज करण्यासाठी यशराजने प्रचंड धडपड केली. देशभरात सर्वाधिक 2500 स्क्रीन्समध्ये रिलीज करण्याचा रेकॉर्ड यशराजने करुन दाखवला. एकेका मल्टीप्लेक्समध्ये दिवसभरात फक्त एक था टायगरचेच शोज हे दृश्य अनेक ठिकाणी बघायला मिळालं. सलमान खानच्या फॅन्सनी तर पहिल्याच दिवशी सिनेमा डोक्यावर घेतला. सिनेमाबद्दल समीक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असली तरी त्याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवर अर्थातच काही परिणाम दिसला नाही. पहिल्याच दिवशी सिनेमाची कमाई पंचवीस कोटीपर्यंत जाईल असा अंदाज होता, पण स्वातंत्र्यदिनाची सुट्टी, सर्वाधिक स्क्रीन्समध्ये रिलीज अशा कारणांमुळे पहिल्याच दिवशी एक था टायगरनं पस्तीस कोटी रुपयांचा पल्ला गाठला. 'दबंग'चं पहिल्या दिवसाचं कलेक्शन होतं साडेचौदा कोटी रुपये आणि त्यापूर्वी आलेल्या 3 इडियट्सची पहिल्या दिवसाची कमाई होती 13 कोटी रुपये… म्हणजे या दोन सिनेमांना मागे टाकत सलमान खाननं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर नवं रेकॉर्ड केलेलं आहे. पण ही तर सुरुवात आहे असंच म्हणायला लागेल कारण या आठवड्यात टायगरला इतर कोणत्याही सिनेमाची स्पर्धा नाही आणि येता वीकेंडसुध्दा ईदची सुट्टी सोमवारी असल्याने मोठा आहे. या वीकेंडला हा टायगर बॉक्स ऑफिस कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडणार असा विश्वासच ट्रेड ऍनालिस्टना वाटतोय.

close