टीम इंडिया आता नव्या जर्शीत

August 16, 2012 2:28 PM0 commentsViews: 3

16 ऑगस्ट

टीम इंडियाला आता नवा लूक मिळाला आहे. नव्या रंगाच्या जर्शीचं आज मुंबईत लॉन्चिंग झालं. ही नवी जर्शी पहिल्या जर्शी पेक्षा लाईट ब्लू रंगाची आहे. मागील जर्शी गडद ब्लू रंगाची होती. या नव्या जर्शीत भारतीय ध्वजाचा रंग डाव्या खांद्यावर आहे. पाढर्‍या पट्यात ज्या ठिकाणी अशोक चक्र येते त्या ठिकाणी क्रिकेट मंडळाचे चिन्ह आले आहे. यावेळी विराट कोहली, सुरेश रैना, आर अश्विन, रोहित शर्मा, इरफान पठाण आणि युवराज सिंग यांनी नव्या जर्शीत रॅम्पवॉक केला. टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाला ही नवी जर्शी देण्यात आली आहे. पण काही असो खेळ मात्र बेस झाला पाहिजे..हिच अपेक्षा..

close