पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण

August 15, 2012 8:57 AM0 commentsViews: 5

15 ऑगस्ट

आज भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्ष पूर्ण झाली आहे. देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत आहे. लाल किल्ल्यावर आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी बोलतांना पंतप्रधानांनी सरकार राज्यसभेतही लोकपाल विधेयक पारित करेल असा विश्वास व्यक्त केला.दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी राजीव गांधी आवास योजनेनुसार घरंासाठी 5 लाखांचं कर्ज देण्याची घोषणाही त्यांनी केली. तसेच मंगळवार यान पाठवण्यासाठी मंगळायन ही मोहिम राबवणार असल्याची घोषणाही केली.त्याचबरोबर यावेळी त्यांनी आसामधला हिंसाचाक दुदैर्वी असल्याचं म्हटलं. तसेच पुण्यातल्या बॉम्बस्फोटामुळे देशाच्या सुरक्षेततेपुढे नवी आव्हानं निर्माण झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

close