बंगळुरू आणि हैदराबादमध्येही अफवांना ऊत

August 16, 2012 4:53 PM0 commentsViews: 5

16 ऑगस्ट

आसाम हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर बंगळुरूमध्येही अफवांना ऊत आला आहे. बंगळुरूमध्ये ईशान्य भारतीयांना लक्ष्य केलं जात असल्याची जोरदार अफवा उठली आणि 15 ऑगस्टला तब्बल 4 हजार लोकांनी गुवाहाटीचा रस्ता धरला. यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या दशकभरापासून ही माणसं बंगळुरूमध्ये राहत होती. आसाममध्ये झालेल्या हिंसाचारानंतर बंगळुरूमधल्या ईशान्य भारतीयांवर हल्ले होतं असल्याची बातमी वणव्यासारखी पसरली. पण तसा एकही गुन्हा पोलिसांकडे दाखल करण्यात आला नाही. ही बातमी मिळताच कर्नाटक प्रशासनाने तात्काळ बैठक बोलावली आणि लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं. हैदराबादमध्येही अशीच परिस्थिती आहे.

close