नरिमन हाउसमध्ये जोरदार गोळीबार

November 28, 2008 1:35 AM0 commentsViews: 1

28 नोव्हेंबर, मुंबई5.50 PMनरिमन हाउसमधला संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहचला आहे. नरिमन हाउसच्या पहिल्या , चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर एनएसजीच्या जवानांनी ताबा मिळवला आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यवर अतिरेकी असून त्यांच्याकडून एनएसजीच्या जवानांवर मोठ्याप्रमाणावर गोळीबार होत आहे. या बिल्डींगमध्ये अजूनही सहा ते सात अतिरेकी असल्याचं बोललं जात आहे, मात्र नेमका आकडा अद्याप कळू शकलेला नाही. जवळपास सर्व ओलिसांची सुटका करण्यात कमांडोजनी यश मिळवलं आहे.दरम्यान नरिमन भवनच्या आसपासच्या सर्व बिल्डींग सुरक्षेच्या कारणास्तव खाली करण्यात आल्या असून त्या बिल्डींगवर लष्करानं आपला कब्जा जमवला आहे. या बिल्डींगमधूनही अतिरेक्यांवर हल्ला केला जात आहे. सकाळी या कारवाईसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला हेलिकॉप्टरमधून कमांडो बिल्डींगच्या छतावर उतरले. खालून आणि वरून दोन्हाकडून अतिरेक्यांवर हल्लाबोल केला जात आहे.नरिमनहाऊसमध्ये लपून बसलेल्या अतिरेक्यांनी रात्री तीन वाजता दोन ग्रेनेड हल्ले केले, तर पहाटे आणखी एक ग्रेनेड हल्ला केला. इथं कमांडो आणि अतिरेक्यांमध्ये संघर्ष सुरू आहे.

close