सीसीएसटी हिंसाचार प्रकरणी 40 जणांची ओळख पटली

August 16, 2012 5:04 PM0 commentsViews: 3

16 ऑगस्ट

मुंबईत शनिवारी झालेल्या हिंसाचाराच्या तपासाला वेग आला आहे. सीएसटी हिंसाचारप्रकरणी 40 दंगलखोरांची ओळख पटली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे ही ओळख पटवण्यात यश आलंय. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी 30 मिनिटांची सीडीही तयार केली आहे. पोलिसांची रायफल हिसकावून तोडणार्‍या व्यक्तीलाही अटक करण्यात आलीय. जोगेश्वरीच्या सलीम चौकियाने असं त्याचं नाव आहे. पण या सभेचा आयोजक मौलाना अहमद रेजा अजूनही फरार आहे. तो 'मदिना तुल इल्म' या संघटनेचा प्रमुख आहे.

close