ममतादीदींविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची तक्रार

August 16, 2012 5:09 PM0 commentsViews: 9

16 ऑगस्ट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी न्यायव्यवस्थेविषयी केलेलं वक्तव्य त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. न्याय विकत घेता येतो, असं वक्तव्य ममतांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत केलं होतं. याविरोधात एका वकीलाने कोलकाता हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. त्याची दखल घेत कोर्टाने यासंबंधीचे पुरावे दाखल करण्याचे आदेश याचिकाकर्ते आणि काही न्यूज चॅनल्सना दिलेत. दरम्यान, केलेल्या वक्तव्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप होत नसल्याचं ममतांनी म्हटलंय. आपण संपूर्ण न्यायव्यवस्था भ्रष्ट असल्याचं म्हटलेलं नाही. पण न्यायालयीन सुधारणांची नितांत गरज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलीय.

close