दुष्काळग्रस्त 64 तालुक्यांना तातडीची मदत

August 17, 2012 11:23 AM0 commentsViews: 1

17 ऑगस्ट

राज्यातल्या 64 तालुक्यांमध्ये दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. पण राज्यात दुष्काळ जाहीर करायचा नाही अशी भुमिका राज्य सरकारने घेतली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये 64 तालुक्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस किंवा पेरण्या झालेल्या आहेत असं आढळून आलं. या 64 तालुक्यांमध्ये तातडीच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आलेल्या आहेत. त्या कायम ठेवण्याचा निर्णय झाला. मात्र काल बंद केलेले चारा डेपो पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला नाही. तसेच रोजगार हमी योजनेच्या मजुरीचे पैसे दोन आठवड्यात द्यायचा निर्णय झाला होता. शिवाय रोजगार हमी योजनेचे राज्यात काय निकष असावे यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखालील या मंत्रिगटात जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बबनराव पाचपुते, जयदत्त क्षीरसागर आणि नितीन राऊत यांचा समावेश असणार आहे.

close