ईशान्य भारतीयांचे जाण्याचे प्रमाण झाले कमी

August 18, 2012 10:18 AM0 commentsViews: 3

18 ऑगस्ट

मुंबईतून गावी परतणार्‍या ईशान्य भारतीयांचं प्रमाण कमी झालं आहे. सरकार आणि विविध संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आलं यश आलं आहे. गेल्या काही दिवासात सोशल साईट्स, एसएमएसवरून अफवा पसरवल्या जात होत्या. या अफवांमुळे भयभीत होऊन ईशान्य भारतातील हजारो नागरिकांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. पण त्यानंतर सरकारकडून कडक पावलं उचलल्यानंतर काही संघटनाही पुढे आल्या. त्यामुळेच ईशान्य भारतात परत जाणार्‍यांची संख्या आता कमी झाली आहे. दरम्यान, ईशान्य भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोडलेल्या दोन खास ट्रेन्स आज सकाळी गुवाहाटीत पोहोचल्या. रेल्वे स्टेशनवर मुलांच्या पालकांनी आणि नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं. धमक्यांच्या अफवांमुळे ही मुलं आपल्या गावी परतत आहेत. मात्र सध्या थोडी भीती वाटत असली तरी वातावरण निवळल्यानंतर आम्ही पुन्हा परत जाऊ असं या विद्यार्थ्यांनी सांगितलंय.

close