बल्क एसएमएसवर 15 दिवसांची बंदी

August 17, 2012 12:27 PM0 commentsViews: 4

17 ऑगस्ट

आसाम आणि म्यानमारमध्ये घडलेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटत आहे. प्रक्षोभक व्हिडिओ,एसएमएस देशभरात पसरवली जात आहे. एक गट टार्गेट करुन त्यांना चिथावणीखोर एसएमएस पाठवले जात आहे. सामाजिक स्वास्थ स्थिर ठेवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. याच एक भाग म्हणून हिंसाचाराबाबत अफवा पसरू नये यासाठी बल्क एसएमएसवर बंदी घालण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. ही बंदी आजपासूनच देशभरात लागू करण्यात आली आहे. यामुळे पाचपेक्षा जास्त एसएमएस पाठवता येणार नाहीत. एसएमएससोबतच एमएमएसवरही बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पंधरा दिवसांसाठी असणार आहे. काही दिवसांपुर्वीच 100 एसएमएसची मर्यादा उठवण्यात आली आहे.

close