पेणमध्ये गणेश मूर्तीची तयारी अंतिम टप्प्यात

August 18, 2012 12:41 PM0 commentsViews: 20

18 ऑगस्ट

गणेशोत्सव आता महिनाभरावर येवून ठेपला आहे. गणेशोमूतीर्ंसाठी जगप्रसिध्द असलेल्या पेणमध्ये सध्या लगबग सुरू आहे ती गणेशमूतीर्ंवर रंगरंगोटीचा अखेरचा हात फिरवण्याची. सुंदर, सुबक गणेशमूर्तींसाठी पेण प्रसिध्द आहे. जगभर मागणी असल्यामुळे वर्षभर इथं मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू असतो. वर्षभरात 20 लाख मूर्ती इंथं बनवल्या जातात. माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि रंगामध्ये वाढ झाल्याने यावेळी मूर्तीच्या किमतीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

close