‘एक था टायगर’वर पाकिस्तानात बंदी

August 17, 2012 12:42 PM0 commentsViews: 6

17 ऑगस्ट

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरीना कैफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'एक था टायगर' या सिनेमाला पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने एक था टायगर सिनेमात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आएसआयची बदनामी केल्यामुळे हा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही असं जाहीर केलंय. यशराजची निर्मिती असलेल्या 'एक था टायगर' हा सिनेमा याच कारणामुळे पाकिस्तान मध्ये नाकारण्यात आल्याचं यशराजच्या सूत्रांनी सांगितलंय. त्याचवेळी 'एक था टायगर'हा सिनेमा भारतात रिलीज झाल्यावर आत्तापर्यंत उत्पनांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. या आधीही 'एक था टायगर'च्या प्रोमजही पाकमध्ये दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती.

close