सांताक्रुझमध्ये नाल्यात महिलेचा मृतदेह सापडला

August 18, 2012 12:45 PM0 commentsViews: 1

18 ऑगस्ट

मुंबईतल्या सांताक्रुझ परिसरामध्ये आज सकाळी आठ वाजता पोलिसांना नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या मते महिलेचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे आहे महिलेची अजूनही ओळख पटू शकली नाही. गेल्या पंधरा दिवसातली ही चौथी घटना आहे ज्यामध्ये महिलेचा मृतदेह पोलिसांना आढळलेला आहे. याआधी मिरारोड आणि मालाड परिसरामध्ये अशाप्रकारे अनोळखी महिलांचे मृतदेह आढळले होते.

close