पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकाम पथकावर दगडफेक

August 18, 2012 2:16 PM0 commentsViews: 2

18 ऑगस्ट

पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेनं मोहिमेला सुरवात केली आङे. 23 अनधिकृत इमारतीवर आज कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिकांनी जोरदार विरोध केलाय. काही ठिकाणी दगडफेक,टायर जाळण्याच्या घटना घडली. पोलिसांना यावेळी सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या प्रकरणीत भाजप शहराध्यक्ष एकनाथ पवारसह चौघांना अटक करण्यात आली आहे. तळवडे येथे महिलांनी रास्ता रोको केला. काही ठिकाणी दगडफेकीच्या तुरळक घटना घडल्यात संतप्त लोकांनी टायर जाळले. अनधिकृत बांधकाम पथकासोबत पोलिसांचा मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.

close