भ्रष्टाचार,दहशतवाद घेऊन जा गे मारबत !

August 18, 2012 2:25 PM0 commentsViews: 57

18 ऑगस्ट

नागपूरमध्ये तान्या पोळ्याच्या दिवशी मारबत काढण्याची परंपरा आहे. गेल्या 125 वर्षापासून ही पंरपरा आजही कायम आहे. या मारबतीत काळी आणि पिवळी महत्वाची मारबत मानली जाते. मारबतची पुजा करुन शहरातून मिरवणूक काढली जाते. या मारबत सोबत बडगे असतात. या माध्यमातून समाजातील चुकीच्या चालीरीती, समाज विरोधी घटना, रोगराई घेवून जा असं आवाहन मारबतला करण्यात येतं. या वर्षी महागाई, दहशतवाद आणि भ्रष्टाचार घेवून जा गे मारबत अशा घोषणा देत मारबत ची मिरवणूक काढण्यात आली. तर गोंदियामध्ये महागाई, भ्रष्टाचाराविरुध्द मारबत काढण्यात आलीय. जिल्हा परिषदेत झालेल्या भ्रष्टाचाराविरु ध्द आणि महागाईविरुध्द भाजप कार्यकर्त्यांनी वाजत गाजत ही मिरवणूक काढली. भ्रष्टाचाराचा आणि भ्रष्टाचारी नेत्यांचा अंत व्हावा यासाठी ही मारबत काढण्यात आलीय. गावाबाहेर नेल्यावर मारबतला जाळण्यात आलं.

close