एमएमएस पाठवणार्‍या 4 तरुणांना अटक

August 20, 2012 3:55 PM0 commentsViews: 2

20 ऑगस्ट

मोबाईलवर आक्षेपार्ह एमएमएस पाठवणार्‍या एक तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर तिघांना ताब्यात घेतलंय. या तरुणांविरोधात आयपीसी (IPC) 153 (अ) माहिती तंत्रज्ञान सुधारित कायदा कलम 66 (ए) आणि 66 (सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसाम आणि म्यानमार इथं झालेल्या दंगलीसंदर्भात धार्मिक भावना भडकावणार्‍या आक्षेपार्ह क्लिप्स मोबाईलवर अपलोड करण्यात आल्यात. अटक करण्यात आलेल्या तिघांना या क्लिप्स कोणी पाठवल्या आणि या तरुणांनी त्या किती लोकांना पाठवल्यात याचा तपास पोलीस करत आहे. अशा एसएमएस आणि एमएमएस मुळेच पुण्याहून अनेक ईशान्य भारतीय तरूण आपापल्या गावी परत गेले आहेत.

close