चार्‍यासाठी आंदोलन करण्यार्‍या शेतकर्‍यांना पोलिसांच्या नोटिसा

August 18, 2012 3:47 PM0 commentsViews: 3

18 ऑगस्ट

15 ऑगस्टपासून चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर त्याचे पडसाद आता दुष्काळग्रस्त भागात उमटू लागले आहेत. सांगलीतल्या उमदी पोलीस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना नोटिसा पाठवायला सुरूवात केली आहे. चार्‍यासाठी यापुढे आंदोलन केल्यास शेतकर्‍यांवर थेट गुन्हे दाखल करून न्यायालयीन कारवाईचा हिसका दाखवण्याचा उल्लेख या नोटीसांमध्ये आहे. एकीकडे सरकारने चारा डेपो बंद केले तर दुसरीकडे पोलिसांकडून आंदोलनं दडपण्याचं काम सुरू असल्याचा कात्रीत शेतकरी सापडलाय. दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना पोलिसांच्या नोटिसा बघून स्थानिक शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्माण झालीय.

close