माजी मंत्री गोपाल कांडांचे अखेरीस समर्पण

August 18, 2012 3:51 PM0 commentsViews: 3

18 ऑगस्ट

हरियाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा हे आज अखेर पोलिसांना शरण आले. त्यांच्या कार्यालयातली कर्मचारी गीतिका शर्मा हिच्या आत्महत्येला जबाबदार धरुन कांडावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात ते मुख्य आरोपी आहेत. पोलिसांना कांडा शरण आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांची रवानगी 13 दिवसांच्या पोलीस कोठडीत केलीय. कोर्टातल्या सुनावणीनंतर कांडा यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

close