मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यांसंदर्भात एकाला अटक

November 28, 2008 3:30 PM0 commentsViews: 3

मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यांसंदर्भात एकाल अटक28 नोव्हेंबर, मुंबईमुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांनी गुरूवारी रात्री इस्माईल नावाच्या एका व्यक्तीस अटक केलीये. तो लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचं सांगितल जात आहे. मोठ्या शस्त्रांनिशी असलेल्या किमान 20 अतिरेक्यांनी हा हल्ला केल्याचं सांगितल जात आहे. आर डी एक्स, एम 6 गन्स. आणि ग्रेनेडस अशा शस्त्रसाठ्यासह आलेले हे अतिरेकी समुद्रामार्गे आले. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनुसार मोठ्या जहाजातून हे अतिरेकी मुंबईजवळच्या समुद्रात उतरले. एनएसजी आणि कमांडोंनी पकडलेल्या चार अतिरेक्यांनी ही धक्कादायक माहिती दिली. त्यांच्यातल्या अमीर कझा कमाल या अतिरेक्यानं सांगितलय की हे सगळे अतिरेकी समुद्रात उतरल्यावर छोट्या बोटीनं मुंबईच्या किनार्‍यावर आले. असून डॉकवर आल्यावर ते पांगले. त्यानंतर 2-2 जणांचा गुप करून त्यांनी हा अमानुष हल्ला केला."अतिरेकी बोटींमधून आले.आणि त्यांनी सरळसरळ ताज तसच ओबेरॉय ट्रायडंटमध्येच कंट्र्‌..ल रूम तयार केली. तिथूनच ते सगळ मॅनेज करत होते. याचा अर्थ कित्येक महिन्यांपासूनचा हा दहशतवाद्यांचा कट होता. एके-47 नव्हे, तर त्यांच्याकडं एम पी 6 सारखी अत्याधुनिक शस्त्र आहेत, यावरूनच सगळ स्पष्ट होतंय" असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.अल कायदाशी संबंध असलेल्या लष्कर-ए – तोयबाच्या अतिरेक्यांनी सामुद्री मार्गानं येऊन हल्ले करण्याचं ट्रेनिंगच घेतलं होतं. भारतीय गुप्तचर संस्था या सगळ्या कराचीच्या किनार्‍यावर चालणार्‍या ट्रेनींग प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. तेलाचे साठे तसच प्रकल्प नष्ट करणं, सामुदि्रक संपत्ती आणि किनारे , बंदरं यांचा विध्वंस घडवून आणण्याचं ट्रेनिंगही या प्रकारात दिल जातं. त्यामुळेच भाभा ऑटोमिक रिसर्च सारख्या ठिकाणांवरही हल्ला होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांनी ही माहिती दिली आहे."एक ग्रुप येऊन पाहणीही करून गेलाय. पण त्यांचा प्लॅन यशस्वी झालेला नसावा. मात्र माझ म्हणणं अस आहे की लष्कर -ए-तोयबाही शेवटी अल कायदाचाच भाग आहे. त्यामुळ अल कायदा इथही आहेच" असं ते म्हणाले. पुढे येणार्‍या पुराव्यांवरून सरकारनं या हल्ल्याप्रकरणी लष्कर -ए-तयबावरचं संशय व्यक्त केलाय. मागील वर्षी जम्मू- काश्मीर पोलिसांनी लष्करचे दोन अतिरेकी पकडले होते. तेव्हाच या समुद्रमार्गाच्या वापर दहशतवादासाठी होणार असल्याचं पोलिसांना कळलं होतं. साएनएन आयबीएनकडे असलेल्या माहितीनुसार मुंबईवर झालेला हल्ला समुद्र मार्गानेच झाला , हे स्पष्ट होतंय.

close