गुलाबराव देवकरांच्या जामिनीवर 25 सप्टेंबरला सुनावणी

August 21, 2012 8:24 AM0 commentsViews: 1

21 ऑगस्ट

जळगांव घरकुल घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकर यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. देवकर यांच्या जामीन प्रकरणी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाकडे मुदत वाढवून मागितली आहे. सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी आता 25 सप्टेंबरला होणार आहे. मागिल महिन्यात घरकुल घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने देवकरांचा जामीन अर्ज रद्द केला. त्यामुळे देवकरांना अटक होण्याची शक्यता होती. कोर्टाच्या या निर्णयाविरुध्द देवकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने देवकरांना तात्पुरता दिलासा देत निर्णयाला स्थगिती दिली होती. आता राज्य सरकारने मुदत वाढवून घेतल्यामुळे देवकरांनी 25 सप्टेंबरपर्यंत दिलासा मिळाला आहे.

close