मनसेच्या आयोजकांविरोधात FIR दाखल

August 21, 2012 5:50 PM0 commentsViews: 6

21 ऑगस्ट

विनापरवानगी निघालेल्या मनसेच्या मोर्चावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. या मोर्चाचे आयोजकांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. मोर्चाचे आयोजक शिरीष सावंत यांच्याविरोधात मुंबई पोलीस ऍक्टअंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. पोलीस परवानगीशिवाय मोर्चा काढल्यामुळे केस दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसेचा मोर्चा होऊन चोवीस तास उलटत नाही तीच पोलिसांनी कारवाईचा केली आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आयबीएन लोकमतकडे याबद्दल बातचीत केली. मनसेच्या मोर्चाला गिरगाव चौपाटी येथून मोर्चा काढण्यास परवानगी देण्यात आली नव्हती तरी सुध्दा त्यांनी मोर्चा काढला. कोर्टाच्या निर्देशानुसार त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती असा खुलासा आर.आर.पाटील यांनी केला.

आज संध्याकाळी मनसेला मोर्चाची परवानगी नव्हती तरी त्यांनी मोर्चा काढला तेव्हा पोलीस कायद्यनुसार कारवाई करतील. याआधी चौपाटीवरून अनेक वेळा मोर्चे निघाले त्यावेळी पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. तशीच इथेही कारवाई होईल असं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. शिवाय राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने करण्यात आली. त्यामुळे ती गंाभीर्याने घेण्याची गरज नाही. आजचा मोर्चा आणि सभा हे मनसेचं शक्तीप्रदर्शन होतं. विरोधकांकडून 11 ऑगस्टच्या घटनेचं राजकीय भांडवल केलं जातंय. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचे अनर्थ वेळीच टळले. त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. मोर्चातल्या ज्या आंदोलकांबद्दल पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण राजकीय मोर्चामुळे कारवाई लांबतं आहे असंही ते म्हणाले होते.

आबा,थोडी तरी लाज उरली असेल तर राजीनामा द्या- राज

close