‘एक था टायगर’ची 5 दिवसात 100 कोटींची कमाई

August 21, 2012 4:43 PM0 commentsViews: 3

21 ऑगस्ट

सलमान खानने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड केला आहे. 'एक था टायगर' सिनेमाने 100 कोटींचा पल्ला ओलांडला आहे. 33 कोटींचे ओपनिंग झाल्यावर एकट्या रविवारीच सिनेमाने 23 कोटींची कमाई केली. त्याआधी 15 ऑगस्टपासून सिनेमाने रोज 12 ते 17 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर पाच दिवसांतच 100 कोटींचा दणदणीत बिझनेस झाला. ट्रेड ऍनलिस्टच्या मते आता हा सिनेमा पहिल्या आठवड्यातच 150 कोटींचा पल्ला पूर्ण करेल. रेडी, दबंग आणि बॉडीगार्डनंतर आता एक था टायगरनंही 100 कोटींचा मुकुट घातला आहे. इतक्या कमी वेळेत एवढा बिझनेस करणारा हा एकमेव सिनेमा ठरला आहे.

close