मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात – प्रणव मुखर्जी

November 28, 2008 4:36 PM0 commentsViews: 5

28 नोव्हेंबर, जोधपूर9.30 PMमुबईवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे. जोधपूर इथे ते बोलत होते. सध्या हाती आलेल्या माहितीवरून हा अंदाज व्यक्त होत असल्याचं त्यांनी सांगितलंय. या हल्यामुळे पाकिस्तानबरोबरची शांतता प्रक्रिया धोक्यात आल्याचं त्यांनी मुखर्जी यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना सांगितलंय. पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी फोनवर बातचीत केली. या हल्ल्यात पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचा हात असल्याचे पुरावे आहेत, असं भारतानं पाकिस्तानला सांगितलंय. आयएसआयच्या प्रमुखांना भारतात पाठवा, त्यांना हे पुरावे दाखवू असं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सांगितलंय. त्यानुसार आयएसआयचे प्रमुख शुजा पाशा भारतात येण्याची शक्यता आहे.

close