हिंसाचारावरुन राजकारण होतंय – माणिकराव ठाकरे

August 20, 2012 2:43 PM0 commentsViews: 14

20 ऑगस्ट

शिवसेना आणि मनसे हिंसाचारावरुन राजकारण करत आहे पण त्याचा काही फायदा होणार नाही. ज्या लोकांनी हिंसाचार केला त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे यासाठी सरकारने ठोस पाऊलं उचलली आहे. पण एखाद्या समुद्याला टार्गेट करुन राजकारण योग्य नाही. सरकारकडे याबद्दल मागणी करुन कारवाई करण्यात यावी अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. उद्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटीवरुन आझाद मैदानाकडे मोर्चा काढण्यात येणार आहे. राज यांच्या पाठोपाठ उध्दव ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

close