चंद्रपुरात 4 वीज संच बंद, लोडशेडिंग वाढणार ?

August 20, 2012 2:54 PM0 commentsViews: 7

20 ऑगस्ट

विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रातील चार संच बंद पडली आहे. गेल्या दोन दिवसांत चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कोळशाचा साठा ओला झाला असून त्यामुळे इथे वीजनिमिर्ती होऊ शकत नाही. संच बंद पडल्यामुळे याचा फटका इतर जिल्ह्याना बसण्याची शक्यता आहे. यामुळे लोडशेडिंगमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतं आहे.

close